*वृक्ष बनण्याच्या प्रक्रियेला* *सुरूवात होते अंकुर फुटण्यापासून*
*मुळांची पकड त्याला वाचवते वादळात तुटण्यापासून...*
“आई!!! बघ ना, हे रोप कसे सुकुन गेले? तीन दिवसापूर्वी तर कळी फुटली होती याला... मी किती काळजी घेतली याची. सुर्याच्या किरणाचा त्रास होऊ नये म्हणून त्याला दिवसभर झाकून ठेवले. त्याच्यावरची धूळ रोज साफ केली. जास्त पाण्यात राहिल्याने सर्दी होऊ नये म्हणून फक्त कळीलाच दोन थेंब पाणी घालत होतो, त्याच्या फांदीला पण किती सजवले होते. एवढा लाड करून, एवढी काळजी घेऊन पण ते का नाही वाढले. कळीचे फूल का नाही बनले?”
बर्‍याच पालकांचे पण आपल्या पाल्याबाबत नियतीला असेच प्रश्न असतात!
प्रत्येक बीजा मध्ये वृक्ष बनण्याची क्षमता असते पण प्रत्येक बीजाचे रूपांतर महाकाय वृक्षात का होत नाही? कारण बर्‍याच वेळेला बीजातून अंकुर फुटेपर्यंत त्याची काळजी घेतली जाते. त्याला नीट खतपाणी घातले जाते. पण बहुतेक वेळेला कळी फुटल्यानंतर _*‘वाढेल आपोआप’* या तत्वावर त्याकडे दुर्लक्ष केले जाते. किंवा अतिकाळजी वा अतिप्रेमामुळे वरवरच्या दिसणार्‍याच बाबींकडे अतिलक्ष जाऊन त्याच्या मूळाकडे दुर्लक्ष होते.
वय वर्ष ६ ते वय वर्ष १४ या वयोगटातील मुलांच्या व्यक्तिमत्व आणि त्याच्या विकासा बाबतीत असेच होते. या वयातील *मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाचे प्रमुख घटक आहेत, शारीरीक विकास, बौद्धिक विकास आणि भावनात्मक विकास.* यांच्या विकासातूनच त्यांचे व्यक्तिमत्व विकसित होत असते.
जसे रोपाच्या उदाहरणातून, रोपाची फांदी म्हणजे शारीरीक विकास, फांदीवरची कळी म्हणजे बौद्धिक विकास, आणि रोपाची मूळं म्हणजे भावनात्मक विकास. बरेच पालक आणि काही शिक्षक सुद्धा हे पाल्याच्या फक्त शारीरिक आणि बौद्धिक विकासाबाबतीच दक्ष असतात.
ज्यांचे व्यक्तिमत्व समाजात प्रभावी म्हणून समजले गेले त्यातले कित्येक जण असे होते जे शारीरीक दृष्टया कदाचित कमी विकसित झाले जसे जन्मापासूनच हात पाय नसतानाही एक यशस्वी व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षक बनलेला निक हुजुकी. कित्येक जण असे होते जे शैक्षणिक दृष्टया मागे पडले उदा. उद्योजक बिल गेट्स.
*यशस्वी लोकांचा अभ्यास आणि मानवी समाजाचा इतिहास हेच सांगतो की जगातील सर्व यशस्वी आणि प्रभावी व्यक्तिमत्व यांच्यात एक गोष्ट समान होती ती म्हणजे त्यांचा भावनात्मक विकास हा परिपूर्ण होता.*
काही असेही लोक झाले ज्यांचात बौद्धिक संपदा प्रचंड होती पण तरिही भावनात्मक विकास योग्य पद्धतीने न झाल्याने ते वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून गणले गेले, जसा ओसामा बिन लादेन. आज काल वर्तमानपत्रातून संगणक अभियंतांच्या आत्महत्येच्या बातम्यातून सुद्धा हेच प्रतित होते. तसेच अंमली पदार्थाच्या चाचणीत दोषी आढळलेले, मॅच फिक्सिंग सारख्या प्रकरणात अडकलेले शारिरिक रित्या सक्षम खेळाडू यांना पाहून सुद्धा भावनात्मक विकासाचे महत्व प्रकर्षाने जाणवते.
आणि ह्याच भावनात्मक विकासाची पाळंमुळं घट्ट करण्याचा सर्वात योग्य काळ म्हणजे वय वर्ष ६ ते वय वर्ष १४. ह्याच काळात त्यांच्या बाबतीत केले गेलेले भावनात्मक विकासासाठीचे प्रयत्न त्यांचे वर्तमान आणि भविष्यकाळातील प्रभावी व यशस्वी व्यक्तिमत्व घडवण्यात मोलाचा वाटा उचलते. बालकांमध्ये उद्दयमशीलता आणि जिज्ञासा यांचा विकास होण्याचा हा काळ असतो. अध्ययनाची आवड मुलांमध्ये या वयात निर्माण होते. उलटप्रकारे मुलाच्या संघर्षाची उकल जर होऊ शकली नाही तर मुलांमध्ये न्यूनतेची भावना उत्पन्न होते. त्याबरोबरच कामासंबंधीची नावड देखील उद्भवते.
आपल्या आयुष्यात सुखदायक आणि दुखदायक दोन्ही प्रकारच्या भावनांचे मिश्रण असते. ज्या भावना अधिक प्रबळ असतात, त्यांचे प्रतिबिंब वागणुकीत आढळून येते. त्याच्या आधारावरच मुलांचा वैयक्तिक आणि सामाजिक विकास अवलंबून असतो. पण त्यासाठी अनुभवी प्रशिक्षकांकडून भावनात्मक विकासाचे मुलांना मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण मिळणे अत्यावश्यक आहे का?
 याचा विचार स्वतः करा!
व्यक्तिमत्व = अनुवंश (Nature) गुणीले परिसर (Nurture)
Article bYogesh Ashok Undede
Certified NLP practitioner (ANLP India)
Certified mind memory trainer

श्री. सुभाष बडे
NLP Practitioner (ANLP India),
study techniques coach
Call for Educational counseling
Mob : 8857964344/8888225745

Share