“लक्ष्य झेप”ची शक्ति जोपासून यशस्वी व्हा !!!
------------------------------------------------------
vicharparivartan.blogspot.com
पण आपल्या हृदयाच्या जवळ असलेल्या दुसर्या प्रश्नाकडे आधी वळूया! आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मिळण्याअगोदर, जरा विचार करा की, खालीलपैकी कुठलेही प्रश्न असे आहेत का, जे आता तुमच्या समोर आहेत किंवा ह्या आधी होते?
माझ्या मुलाच्या करिअरची बांधणी कशी करता येईल? माझ्या मुलाचा राग कमी करता येईल का? माझी नाती अजून सशक्त, सुखी आणि समाधानकारक कशी होऊ शकतील? मला काही गोष्टींची खूप भीती वाटते, ती घालवता येईल का? गोल सेटिंग तर करतो, पण तरीही काही साध्य होत नाही - कधी प्रेरणा नसते तर कधी संभ्रम असतो की ठरवलेलं उद्दिष्ट साध्य कसं करायचं -स्वयंप्रेरीत कसं रहायचं आणि संभ्रम दूर करून निर्णय कसे घ्यायचे हे शिकता येईल का ? माझ्या मुलाला एक जबरदस्त वक्ता बनवायचंय ? काही लोकांना कितीही समजावलं तरी ते समजतच नाहीत, त्यांना कसं समजवायचं हे शिकता येईल का? कोणाशीही पहिल्या भेटीत झटकन नातं कसं जोडता येईल? आणि नको असेल तर त्या व्यक्तीला वाईट न वाटता त्यांच्यापासून दूर कसं होता येईल? लोकांचे भाषेचे खेळ पकडण्यात अजून सक्षम कसं होता येईल? माझे किंवा इतरांचे चुकीचे दृढविश्वास बदलता येतील का? काही व्यक्तींची किंवा जागेची किंवा गाण्याची किंवा अशाच कुठल्या गोष्टीची आठवण झाली की खूप वाईट वाटतं - ते घालवता येईल का आणि कसं? द्विधा मन:स्थिती पटकन कशी दूर करायची ? एका झटक्यात थकवा घालवून कामासाठी तयारी करायला शिकता येईल का? बर्याच गोष्टी मला कळतात, पण वळत नाहीत - त्या कशा वळवायच्या? मुलाच्या अभ्यासात एकाग्रता नाही ती कशी वाढवावी ? मुलगा खूपच चंचल असल्यामुळे अभ्यास जास्त वेळ करत नाही? अभ्यास लवकर विसरतो? वरच्यापैकी कुठलेही किंवा असेच दुसरे काही प्रश्न जर आपल्यासमोर उभे राहत असतील, तर हा लेख वाचून बराच फायदा होईल...
“लक्ष्य झेप” शिकल्याने आणि वापरल्याने तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या जवळच्या लोकांच्या भविष्याला घडवायची ताकद मिळेल आणि नशिवावर ताबा मिळवता येईल. “लक्ष्य झेप” शिकल्याने तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या नात्यांमध्ये परत जादू निर्माण करू शकाल आणि नविन नाती सुरुवातीपासूनच एकदम आपुलकीची घडवू शकाल. “लक्ष्य झेप” शिकल्याने तुम्ही आयुष्यात आत्तापेक्षाही जास्तीत जास्ती अशी अनेक बक्षिसं, पदकं आणि प्रमाणपत्रं मिळवू शकाल. “लक्ष्य झेप” ची शक्ती जोपासून यशस्वी व्हा! हे ह्या लेखाचं शीर्षक आहे, ह्याचं मूळ कारण असं, की आपल्या सर्वांमध्ये, आपण आज जे काही आहोत, त्याहून खूप जास्त व्हायची क्षमता असते. पण बरेच वेळा ही लक्ष्यशक्ती साध्य कशी करायची हे मात्र आपल्याला माहीत नसतं. कारण हा एक असा विषय आहे, जो ना कधी शाळेत शिकिवला गेला ना कधी कॉलेजमध्ये. माझ्यात जी शक्ती आहे ती मी जोपासून अजून जास्त यशस्वी कसा होऊ हा विषय आपल्याला कधीच कोणी शिकिवला नाही. ना आईवडिलांनी ना शिक्षकांनी. आपणच नेहमी धडपडत हळूहळू वेगवेगळया गोष्टी शिकत जातो आणि ह्या प्रवासात बराच वेळ, मेहनत आणि पैसा खर्च होतो. हेच सगळं झटापट शिकणं शक्य आहे आणि ते कसं शिकायचं हे समजावं म्हणून या लेखाचं शीर्षक आहे “लक्ष्य झेप” ची शक्ती जोपासून यशस्वी व्हा!
“लक्ष्य झेप” म्हणजे काय ?
१) संभाषणाचेcommunication), शास्त्र (science), कला (art) व तंत्र (technique) म्हणजे लक्ष्य झेप.
२) नवीन गोष्टी सहजपणे(easily) व जलद (fast) शिकण्याची गुरुकिल्ली (master key) म्हणजे लक्ष्य झेप.
१) संभाषणाचेcommunication), शास्त्र (science), कला (art) व तंत्र (technique) म्हणजे लक्ष्य झेप.
२) नवीन गोष्टी सहजपणे(easily) व जलद (fast) शिकण्याची गुरुकिल्ली (master key) म्हणजे लक्ष्य झेप.
३) यशस्वी (successful) व्यक्तीत उत्साह (enthusiasm) व उर्मी (passion) कशी निर्माण होते यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे लक्ष्य झेप.
४) तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवे असलेले परिणाम (desired outcome) घडवून आणण्याचे शास्त्र म्हणजे लक्ष्य झेप.
५) इतरांवर कोणताही द्बाव न टाकता प्रभाव (influence) टाकणे म्हणजे लक्ष्य झेप.
६) जगातील सर्वात अत्याधुनिक संगणक (super computer) म्हणजे तुमचा मेन्दू त्याचा विकास करण्याचे तंत्र म्हणजे लक्ष्य झेप.
७) आदर्श विद्यार्थ्याच्या यशाचे रहस्य (secret) म्हणजे लक्ष्य झेप.
८) स्वत:चे उज्वल व यशस्वी आयुष्य स्वत: निर्माण करण्याची कला (self help) म्हणजे लक्ष्य झेप.
९) स्वत:ला व इतरांना वास्तवाची (Reality) जाणीव करून देणे म्हणजे लक्ष्य झेप.
१०) विद्यार्थ्यामध्ये व त्याच्या कुटुंबामध्ये जाणीवपुर्वक बदल घडवून आणण्य़ाचे साधन (Management Tool) म्हणजे लक्ष्य झेप.
११) आदर्श विद्यार्थ्याच्या अनुभवांचा (Experience) अभ्यास म्हणजे लक्ष्य झेप.
१२)अत्यूच्च व परकोटीची कल्पकता, निर्माणक्षमता (creativity) जी तुमच्यात होती पण तुम्ही ती तुमच्या वाढत्या वयाबरोबर विसरून गेला आहात त्या क्षमता परत मिळविणे म्हणजे लक्ष्य झेप.
या व्याख्या व संदर्भ हे लेख वाचतांना तुमच्या लक्षात येतील एवढेच काय नंतर तुम्ही स्वत:ची व्याख्या तयार करू शकाल.
वरील विषयी प्रत्यक्ष मोफत प्रात्यक्षिक पाहाण्यासाठी संपर्क करू शकता.
श्री. सुभाष बडे (ब्रांच मॅनेजर, लक्ष्य गुरुकुल निगडी पुणे)
Certified NLP practitioner (ANLP India)
Educational Counsellor
Mob: 8857964344 / 8888225745
श्री. सुभाष बडे (ब्रांच मॅनेजर, लक्ष्य गुरुकुल निगडी पुणे)
Certified NLP practitioner (ANLP India)
Educational Counsellor
Mob: 8857964344 / 8888225745
Share
No comments:
Post a Comment
Thank You..!
For your valuable message...